जलरंगातील अलिबाग

फेसबुक च्या माध्यमातून अमोल सरांची जलरंगाची कार्यशाळा असल्याचे समजले.  पण माझी गेल्या ६ महिन्यात बरीच भ्रमंती झाली असल्यामुळे जावे की नाही हे  ठरत नव्हते.शिवाय फेब्रुवारी महिन्यातील केरळ ला अनुभवलेला उन्हाचा तडाखा आठवला , त्यामुळे मे महिन्यात अलीबाग मध्ये कसे वातावरण असेल असाही विचार आला. संस्कार भारतीच्या आउटडोअरला अमोल सरांचे निसर्गचित्रण पाहण्याचा योग बऱ्याच वेळा आला, परंतु… Continue reading जलरंगातील अलिबाग

चित्रप्रवास एका चित्रांगनेचा

फेसबुक मधून भेटनाऱ्या मित्रपरिवरातील प्रिया पाटिल ह्या मैत्रिणींने दोन महिन्यांपूर्वी एका चित्रप्रदर्शना निमित्ताने फ़ोन वरुन  सम्पर्क केला. काही वैयक्तिक कारणामुळे माझ्याकडून उत्तर नाही आले तरी त्यांनी परत मला प्रदर्शनात भाग घेण्यास प्रवृत्त केले. व्हाट्सअप ग्रुप मुळे कल्पना येत गेली की ३६ जणींचा सहभाग असणार आहे. फ़क्त मुंबईच्याच  नव्हे तर  इंदौर , नागपुर, पुणे येथील चित्रकर्त्या सहभागी… Continue reading चित्रप्रवास एका चित्रांगनेचा

रात्रीस खेळ चाले

सध्या जोरात चालु असलेल्या   “रात्रीस खेळ चाले” ह्या मराठी मालिकेचे परिक्षण  नाहीये. ही आहे गोष्ट एका रंगलेल्या गाण्याच्या मैफिलिची ! नुकत्याच झालेल्या आमच्या कर्जत निवासी शिबिरात रात्रीच्या जेवणानंतर जाधव सरांनी सर्वाना चित्रांबद्दल मार्गदर्शन केले.  काही दमलेल्या जीवांनी झोपणे पसंत केले. पण आमच्या पैकी काही अतिउत्साही कलाकारांनी  स्वयंपाकघरातील टेबलावरच  गाणे गुणगुण्यांस  सुरुवात केली.   साथ  होती अंकुरच्या… Continue reading रात्रीस खेळ चाले

खांडपे गांव निसर्गचित्रण 2

कर्जत हे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. परंतु पहिल्या दिवशी उन्हाच्या झळा जाणवल्या, रात्री हि तसेच वातावरण होते. पहाटे – पहाटे मात्र थोडा थंडावा जाणवला त्यामुळे दुसऱ्या दिवसाची सुरुवात उत्साहाने झाली. प्रथम नजर गेली ती मागच्या बाजूला असलेल्या सी- सॅा , त्राम्पोलीन, मेरी-गो-राउंड या क्रीडा साहित्याकडे. मेरी गो राउंड वर थोडे बालपण अनुभवले अन कुणी पाहात… Continue reading खांडपे गांव निसर्गचित्रण 2

खांडपे गांव निसर्गचित्रण

कर्जतच्या  निवासी शिबिराचे वेळा पत्रक हातात  आले, पहाटे ४.३० ला   निघायचे होते.  माझी मैत्रीण अनुराधाच्या यजमानांनी आम्हाला रेल्वेस्थानकावर  सोडल्यामुळे  आम्ही अगदी वेळेवर पोहचलो होतो. पहाटेचे प्रसन्न वातावरण , सुट्टीचा मुड  , ३ दिवस मनमुराद चित्रे काढण्याचा मनसूबा .. एकदम ढिंच्यॅक सुरवात झाली होती त्यामुळे सिवूडस् स्टेशन वरुन मेल एक्सप्रेसचे जाणे पण आम्ही मस्त अनुभवले.( वाशी ते पनवेल मार्गावरील सिवूडस्… Continue reading खांडपे गांव निसर्गचित्रण

कलासाधना …गोदावरीतीरी

दर बारा वर्षांनी येणारी सिंहास्त पर्व हि आपल्यासाठी एक पर्वणी असते. ह्या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला जायची खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव जाणे झाले नाही. त्यामुळे जेव्हा  नाशिक कलानिकेतन (चित्रकला महाविद्यालय ) च्या “पोर्टेट आणि  रचना ” ह्या विषयावरील  निवासी शिबीर होणार हे कळल्यावर मला आनंदच झाला. एकट्याने प्रवास तसेच अनोळख्या ठिकाणी जाणे हे माझ्यासाठी… Continue reading कलासाधना …गोदावरीतीरी

आंजर्ले – हर्णे

हर्णे बंदर

आंजर्ले येथील  संस्कार-भारती निवासी वर्गाच्या  दुसऱ्या  दिवशी , आम्ही हर्णे बंदरावर गेलो. आंजर्ले वरून साधारण अर्धा – पाउण तासात आपण हर्णेला  पोहचतो. आंजर्ले व हर्णे  गावांना जोडणारा पूल  हा देखील तितकाच देखणा आहे. खाडीत उभी असलेल्या होड्याना कैमेऱ्यात टिपण्याचा मोह मी आवरू नाही शकले. चालत्या बसमधुन काढलेले फोटो तितकेसे छान नाही आले, पण बोलके नक्कीच आहेत. हर्णे किनारा हा पांढरा… Continue reading आंजर्ले – हर्णे

आंजर्ले – एक आठवण

मस्त स्पॉट

मागच्या आठवड्यात संस्कार भारतीचा निवासी वर्ग  आंजर्ले येथे संपन्न झाला. प्रसन्न सकाळ म्हणजे काय हे तिथे पोहचल्यावर लगेच जाणावले. नारळ , सुपारीची झाडे , लालबुंद माती , थंड  हवा,स्वच्छ आभाळ , कौलारू घरे सगळेच काही हरखून जावे असे होते. चौसोपी वाड्यातील झोपाळा, शेणाने सारवलेली जमीन,चूल, भिंतीतील चौकोनी- त्रिकोणी , छोटी – मोठी फडताळे , जुन्या पद्धतीचे… Continue reading आंजर्ले – एक आठवण

सुरुवात रेखाप्रवासाची …

सहा महिन्यात ५००० स्केचेस पूर्ण करण्याची   स्पर्धा फेसबुक वर पाहिली . माझे स्केचिंग एवढे चांगले नाही , खूप वाईट हि  नाही .  ह्या स्पर्धेत दररोज २७ स्केचेस करणे अभिप्रेत होते, म्हणून  सहभागी होण्याचे धारिष्ट नाही करू शकले. साधारण एक महिन्याने , माझ्यातील विद्यार्थिनी जागी झाली. मी ह्या स्पर्धेत एक महिना उशीरा सहभागी झाले त्यामुळे अर्थातच प्रत्येक दिवशी… Continue reading सुरुवात रेखाप्रवासाची …

पप्पा

मी पप्पांची मधली सुन. मधल्या मुलाला काहि अधिकार नसतात,पर्यायाने सुनेलासुध्दा. तेव्हा पप्पाबद्द्ल लिहीण्याचा अधिकार आहे कि नाही, हे जाणुन न घेता लिहिते. पप्पांना दिलेली ही ओबडधोबड श्रद्धांजली! आपल्याकडे भरपुर बोलणे हा चांगलेपणाचा निकष आहे, मनाचा निर्मळपणा ह्याला महत्व नसते. माझ्यामते पप्पा मनाने निर्मळ होते, त्यांनी आपले मत कोणावर थोपण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना ते जमले… Continue reading पप्पा